शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाम धावणाऱ्या वाहनांना बसणार लगाम; आरटीओच्या वायुपथकात ८ इंटरसेप्टर वाहन 

By सुमेध वाघमार | Updated: January 11, 2024 19:39 IST

राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

नागपूर: राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकांमध्ये १८७ ‘इंटरसेप्टर वाहन’ वाढविण्याला मंजुरी मिळाली आहे. यातील ८ वाहने नागपूरच्या आरटीओ कार्यालयांना उपलब्ध होणार आहेत. यात ‘लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा’ असल्याने बेलगाम धावणाºया वाहनांना लगाम लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वायुवेग पथकाचा ताफ्यात २०२१ मध्ये १३.६८ कोटी खर्चून ७६ नवी वाहने आली होती. आता ३८ कोटी ३३ लाख रुपये खर्चून १८७ ‘इंटरसेप्टर’ वाहनांची भर पडणार आहे. यामध्ये एका वाहनावर सुमारे २० लाख ५० रुपये खर्च केला जाणार आहे. नागपूरच्या ग्रामणी आरटीओ कार्यालयाला ५, शहर आरटीओ कार्यालयाला २ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १ असे एकूण ८ वाहने उपलब्ध होणार आहेत. येत्या मार्चपर्यंत ‘इंटरसेप्टर’ वाहने परिवहन विभागाकडे येतील. त्याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश होण्याची शक्यता आहे. 

वेग वाढवताच कॅमेऱ्यामध्ये कैद ‘इंटरसेप्टर’ वाहनांमध्ये ‘लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेसर कॅमेरा’ बसविण्यात येणार आहे. यामुळे किती वेगात वाहन असलेतरी वाहनाचा वेग व नंबर प्लेटचा फोटो कॅमेºयात कै द होणार आहे. सोबतच या वाहनांमध्ये ‘अल्कोहल ब्रेथ अ‍ॅनालायझर’सुद्धा  असणार आहे. यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह' कारवाईला गती येणार आहे. विशेष म्हणजे, याचा प्रिंटेड अहवाल आणि छायाचित्रही मिळणार आहे. सोबतच गुळगुळीत झालेल्या टायरवर कारवाई करण्यासाठी आवश्यक उपकरणासह काळी काच मोजणारी ‘टिंट मीटर’ही असणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर