शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सी-२० च्या तयारीसाठी महापालिकेनेच वीज चोरली, महावितरणची कारवाई; ५० हजाराचा दंड वसुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:38 IST

जी २० परिषेदेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी महानगर पालिकेने १३ ठिकाणी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे.

- आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात जी २० अंतर्गत होऊ घातलेल्या सी-२० परिषदेसाठी संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली आहे. हे करीत असताना खासगी कंत्राटदाराकडून अनधिकृतरित्या वीज वापर केल्याचे निर्दशनास आले आहे. महावितरणने याची दखल घेत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे पत्र महानगरपालिकेला दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत वीज वापर होत असल्याचे महावितरणला आढळून आले अशा ७ ठिकाणी महावितरणने कारवाई करून सुमारे ५० हजार रुपयांचं दंड वसूल केला आहे.

जी २० परिषेदेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी महानगर पालिकेने १३ ठिकाणी अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. त्यात काँग्रेस नगर विभागात ८ तर सिव्हिल लाईन भागात ४ अशा १२ ठिकाणी वीज जोडणीचा समावेश आहे. याशिवाय आणखी ९ ठिकाणी नवीन वीज जोडणी साठी अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणी रोषणाई साठी खासगी कंत्राटदाराकडून अनधिकृतरित्या वीज वापर होत असल्याचे महावितरणला आढळून आले. त्याठिकाणी महावितरण ने तात्काळ तेथील वायर जप्त केले व संबंधितांवर कारवाई केली आहे.

दिनांक १५ मार्च ला सोमलवाडा चौकात व सिव्हिल लाईन विभागात महावितरणने कंत्रातदारविरुद्ध वीज कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करून एकूण १८,६३० रुपये वसूल केले आहे.तसेच शहरात अन्यत्र ६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून या कंत्राटदाराकडून ३० हजार १३०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महावितरणने अधिकृतरित्या वीज जोडण्या घेण्याबाबत महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना अधिकृत वीज जोडण्या घेण्या बाबत विनंती केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर