शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एम्प्रेस सिटी व मॉलचे अनधिकृत बांधकाम तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:41 IST

एम्प्रेस सिटी व मॉल मधील अनधिकृत बांधकाम तोडले जाईल. शासनातर्फे न्यायालयातही योग्य ती भूमिका मांडली जाईल. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.

ठळक मुद्देलोकमत दखल.......मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन : सोले, गाणार, व्यास यांनी उपस्थित केला प्रश्न

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एम्प्रेस सिटी व मॉल मधील अनधिकृत बांधकाम तोडले जाईल. शासनातर्फे न्यायालयातही योग्य ती भूमिका मांडली जाईल. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.आमदार अनिल सोले, नागो गाणार, गिरीश व्यास, मितेश भांगडिया यांनी या संबंधिचा प्रश्न उपस्थित केला होता. एम्प्रेस सिटी व मॉलने मोठ्या प्रमाणात अनधिृत बांधकामन केले असून महापालिका प्रशासन त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लोकमतने चव्हाट्यावर आणले होते. संबंधित मॉलमध्ये महापालिकेचे कोट्यवदी रुपये थकीत असल्यावरही प्रकाश टाकला होता. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत नागपुरातील विधान परिषद सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोतत्तराच्या तासात या संबंधीचा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.आ. अनिल सोले म्हणाले, एम्प्रेस सिटी व मॉलमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याकरिता केएसएल आणि इण्डस्ट्रीजची सुधारित ले-आऊट योजना नागपूर महापालिकेने नाकारली आहे. माहितीच्या अधिकाराता मिळालेल्या कागदपत्रांनुसार फायरर अ‍ॅण्ड इमर्जन्सी सर्व्हिसेस डिपार्टमेंटने जारी केलेल्या फिटनेस सर्टीफिकेटची वैधताही डिसेंबर २०१७ मध्ये संपली आहे. याशिवाय केएसएलने ले-आऊटमध्ये मनोरंजनासाठी आवश्यक असलेली जागाही सोडलेली नाही. महाराष्ट्र राज्य अनिवासी प्रमाणपत्रही सादर केले नाही. चौथ्या मजल्यावर पार्किंगची व्यवस्था केली नाही. महापालिकेची मालमत्ता कराची व पाणी देयकाची रक्कम तसेच बेसमेंट खोदताना रॉयल्टीही भरलेली नाही. भाग भोगवटा देखील भरलेला नाही. असे असतानाही मॉल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोषींवर फोजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येथील अनधिकृत बांधकामाची माहापलिकेने दखल घेतली आहे. दोनदा अंशत: निर्मूलनाची कारवाई देखील केली आहे. सध्यस्थितीत उच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे कारवाई प्रलंबित आहे. हे प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली जाईल, असे आश्वस्त करीत येथील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Empress Mallएम्प्रेस मॉलnagpurनागपूर