शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी प्रवास सुखद करण्यासाठी रेल्वेची योजना, गर्दीचे नियंत्रण अन् प्रवाशांच्या सुरक्षेवर भर

By नरेश डोंगरे | Updated: March 4, 2025 19:53 IST

Nagpur News: उन्हाळ्यात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.

- नरेश डोंगरेनागपूर - उन्हाळ्यात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.

अन्य ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रवास करणारांची संख्या अचानक वाढते. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. दुसरीकडे काही प्रांतात उन्हाळ्यात कामाच्या संधी कमी होतात आणि काही प्रदेशात रोजगारांच्या संधी वाढतात. त्यामुळे कामगार वर्गांची ईकडून तिकडे जा-ये वाढत असल्याने रेल्वे गाड्यां प्रवाशांनी भरभरून धावत असल्याचे दिसते. प्रवाशांची अचानक गर्दी वाढल्याने अनेक गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही. दुसरीकडे गर्दीचे नियंत्रण करणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना प्रवास करताना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता यावे म्हणून आतापासूनच उपाययोपजना सुरू केल्या आहेत.

गर्दी व्यवस्थापनप्रवाशांच्या मदतीसाठी विशेष मदत केंद्र आणि अतिरिक्त तिकीट बुकिंग काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी विविध स्थानकांवर रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याची सुविधाविविध रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठी असते अशा अनेक स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन, पाणपोई आणि अतिरिक्त वॉटर कूलर बसविण्यात आले आहेत.

आरामदायक व्यवस्थाठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरील प्रतीक्षालये तसेच रिटायरिंग रूममध्ये वातानुकूलन प्रणाली आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वातानुकूलित प्रतीक्षालयांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती व्हावी म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

वैद्यकीय सुविधामोठ्या आणि नागपूरसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर २४ बाय ७ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्राथमिक उपचार पेट्या तसेच वैद्यकीय कर्मचारी कार्यरत राहिल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

स्वच्छता मोहीमउन्हाळ्यात घाण, कचरा होऊ नये म्हणून विविध स्थानकांवर विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहे. प्रतीक्षालये, प्लॅटफॉर्म आणि प्रवासी डब्यांची स्वच्छता वारंवार होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे