लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड/कुही) : टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात योगिता सुमित वाढवे (२५), राजिता जगदीश कुमरे (२५) दोघेही रा. चांपा ता. उमरेड आणि प्रमोद श्रीराम उईके (४०) रा. तारणा ता. कुही यांचा मृत्यू झाला. तिघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी टाटा सुपर एसचा चालक शेख इमरान शेख मुश्ताक (३१) रा.मोठा ताजबाग, नागपूर याला कुही पोलिसांनी अटक केली आहे.
उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:41 IST
टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार
ठळक मुद्देटाटा सुपर एसची दुचाकीला धडक