शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 21:46 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमंत्रालयातील बैठक : ६०५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २९५ हेक्टर जागा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने आवश्यक ती तांत्रिक पूर्तता करण्याचे निर्देशही राज्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.उमरेड-पवनी-कऱ्हांडला वाढीव अभयारण्य क्षेत्रासंदर्भात झालेल्या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते आणि वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत डॉ. परिणय फुके म्हणाले, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या सभोवताल अरण्य परिसर वाढत आहे. त्यामुळे या परिसरात अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. या अभयारण्याचा विस्तार होणार असल्याने, या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल, अशी सूचना त्यांनी केली. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जमिनीवर करता येणार आहे.पुनर्वसन केल्या जाणाऱ्या गावकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले. मात्र ही नुकसान भरपाई नेमकी कोणत्या प्रकारची असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात क्षेत्र अधिसूचित केल्यावर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभयारण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे संकेतही त्यांनी या बैठकीत दिले आहेत.पुनर्वसन उपविभागीय अधिकारी नेमणारया गावकऱ्यांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.पुनर्वसनासंदर्भातील कारवाई केली जात असताना उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी द्याव्यात, असे बैठकीत ठरले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेforestजंगल