शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 21:56 IST

ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरवाडी डालडा कंपनी चौक येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून उमेशबाबू यांचे एकूण कार्य पाहता व त्यांचे समाजासाठीचे योगदान बघता त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच ही विनंती मान्य करीत जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिले. यानंतर तातडीने प्रशासन कामाला लागले. दुपारी ४ वाजता तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा निघाली. नया खूनचे कार्यालय, संत्रा मार्केट चौक, विजय टॉकीजमार्गे अंत्ययात्रा मोक्षधाम घाटावर पोहोचली. यावेळी उमेशबाबू अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादला होता. येथे पोलिसांच्या जवानांनी बंदुकीच्या ११ फैरी झाडून उमेशबाबूंना सलामी दिली.यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी पालकमंत्री आणि गिरीश गांधी यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. शोकसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, रिपाइंचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी खासदार प्रकाश जाधव, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. आशिष देशमुख, आ. गिरीश व्यास, जिल्हाधिकरी अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, बाबुराव तिडके, माजी आमदार मोहन मते, एस.क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, हरिभाऊ नाईक, शब्बीर विद्रोही, डॉ. गोविंद वर्मा, उज्ज्वल ठेंगडी, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, हरीश अड्याळकर, डॉ. हरीश धुरट, विलास गजघाटे, भीमराव फुसे, वंदना भगत, सुरेश घाटे, प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी आदींसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारितासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक