शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उमा भारतीही संघ दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.

ठळक मुद्देतर्कवितर्कांना जोर : लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रेशीमबाग स्मृतीभवन येथे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या विधानसभा निवडणुका असतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांशी समन्वय राहावा किंवा असा समन्वय साधला जावा, असे प्रयत्न करण्यासाठी ही बैठक होती, असेही म्हटले जात आहे. मात्र, बैठकीचे नेमके कारण काय, बैठकीत आणखी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, हे अजून समोर आले नाही.मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. उमा भारती या नागपुरात मा.गो. वैद्य यांना भेटण्यासाठी येत-जात असतात. परंतु शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या नागपुरात पोहोचताच थेट संघ मुख्यालयात गेल्या. यानंतर त्यांनी मा.गो. वैद्य यांचीही भेट घेतली. उमा भारती या नागपूरला आल्या की, पत्रकारांशी थेट खुली चर्चा करतात. परंतु आजची बैठक मात्र त्यांनी अतिशय गोपनीय ठेवली होती. तसेच संघ मुख्यालयाबाहेर असलेल्या पत्रकारांशी कुठलीही चर्चा न करताच त्या निघून गेल्या. विशेष म्हणजे संघांच्या अनेक पदाधिकाºयांनाही त्यांच्या भेटीची माहिती नव्हती.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय