शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरेंचं भाषण शिवाजी पार्कसारखं, शेतकऱ्यांचा नामोल्लेखही नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:01 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी फक्त शिवाजी पार्कवरचं भाषण केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलं नाही, असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास सभात्याग केला. 

राज्यपालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षासारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, असंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देऊ असं घोषित केलं होतं मात्र, त्यांच्या पदरी काहीही पडलं नाही. त्यांच्या भाषणात शेतकरी हा विषयदेखील आला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, स्वा. सावरकरांच्या संदर्भातले मुद्दे असतील याला बगल दिली. आमची एकच अपेक्षा होती, त्यांनी स्वत: वचन दिलं होतं की, अवकाळी पावसाळाग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करू. मात्र, एक रुपयाचीही मदत केली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं नावही घेतलं नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो असेही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजपा आमदारांसह फडणवीस यांनी सभात्याग केला. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन