शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल"

By कमलेश वानखेडे | Updated: April 13, 2024 17:08 IST

नीलम गोऱ्हे यांची टीका : रामटेक मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी.

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रचंड मोठा द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. ते त्यांच्या मनातील बोलत आहेत. जामिनीवरील लोकांचे काय मत आहे, हे ४ जूनला सिद्ध होईल. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, राजकीय दृष्ट्या जनाधार संपला एवढे मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, अशी टीका विधान परिदेच्या उपसभापती व शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.

रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सकाळी त्या नागपुरात दाखल झाल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गजानन कीर्तिकर यांनी ईडी, सीबीआय संदर्भात व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असावे, त्यांच्या वैयक्तिक मतासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेईल. संजय राऊत यांचा प्रचंड ज्ञानी आहे, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच आहे.राहुल गांधी यांनी स्वत:च केलेले जाहीरनामे आणि मनमोहन सिंग यांच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून तर टाकणार नाही ना, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

भावना गवळी यांना सामावून घेऊ- खा. भावना गवळी यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहणार नाही. त्यांना सामावून घेऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावना गवळी यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

अवकाळी नुकसानीच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश- विदर्भात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल आहे. प्रचार सुरू होण्याअगोदर त्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिलेले आहे. पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, किती नुकसान झाले. याचा अंदाज घेण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे असते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे