शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"घरात बसून कारभार करूनही पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 21:02 IST

आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

नागपूर - घरात बसून कारभार करत असूनही लोकांच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं? एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात नागपूरला आणणार होते पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करतात. ८-९ वर्ष मोदींनी काय केले? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मविआच्या वज्रमूठ सभेतून सत्ताधाऱ्यांना विचारला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की,  बाप चोरणारी ही अवलाद न यांचे कुणी दैवत ना आदर्श. चंद्रकांत पाटील गेले होते का अयोध्येला? संघाला चंद्रकांत पाटलांचे म्हणणे पटतय का?  शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता. मी आव्हान देतो या मैदानात, मैदान मिळू नये म्हणून काड्या कसल्या करता. जनता जो निर्णय घेईल तो विनम्र पणे स्वीकारेल. आजची मविआची दुसरी सभा. आजची सभा उपराजधानीत. मागे कस्तुरचंद पार्कला सभा घेतली तेव्हा शेतकऱ्यांच्यी कर्जमुक्ती करण्याचा निश्चय केला होता. आता भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी घटनेसाठी आयुष्यं दिलं. त्यांच्या घटनेचे रक्षण मीच करणार ही आपण सगळ्यांनी निश्चय करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. हे उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट होतेय. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करुन दाखवले मग सभा घेतोय. गद्दारी करुन सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर. विदर्भावर अन्याय झाले म्हणून बोंबलतात. मी अयोध्येला गेलो तेव्हा सुनील केदार पण सोबत होते. शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकार हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेताहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलमुख्यमंत्री खरच राम भक्त असते तर सुरत गुवाहटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? नाही हे गेले म्हणून फडणवीस गेले. इकडे अवकाळी पण राम राज्य महाराष्ट्रात, देशात कधी येणार? शेतकरी रडतोय मग मागून मुख्यमंत्री जाऊन बोलतात. आम्ही वेळीच मदत केली होती.  काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत? आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभेनंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? मोहन भागवत मशिदीत गेले मी गेलो असतो तर? हिंदुत्वाच्या भाकड कथा मला सांगू नका या देशासाठी त्याग करणारा हिंदू असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी