शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाडा तलावात नागपूरच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 20:48 IST

Two youths drowned death सहलीसाठी आलेल्या सहापैकी दोन मित्रांचा रामटेक येथील अंबाडा तलावात बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्दे तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) : सहलीसाठी आलेल्या सहापैकी दोन मित्रांचा रामटेक येथील अंबाडा तलावात बुडून मृत्यू झाला. निसर्ग प्रभाकर वाघ (१८) व कुणाल अशोक नेवारे (१८) दोघेही रा.रविनगर, नागपूर अशी मृत युवकांची नावे आहेत. शासनाने अनलॉक केले आणि पर्यटक सैरभैर झाले. नागपुरातील सुखवस्तू कुटुंबातील सहा युवक मंगळवारी  रामटेकच्या अंबाडा तलाव परीसरात सहलीसाठी आले होते. पोहता येत नसतानाही तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले. मौजमस्ती करता करता चार युवक तलावात बुडायला लागले. यात दोघांनी एकमेकाला वाचविले. पण दोघांना जलसमाधी मिळाली. नागपूर येथून निसर्ग वाघ, कुणाल नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे व लक्ष्मीकांत बबडीलवार हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनाने अंबाडा येथे पोहोचले. सध्या मंदीर व तिर्थक्षेत्र बंद आहे. येथे तपासणी नाक्यावर त्यांची गाडी थांबविण्यात आली. यानंतर या तरुणांनी गाडी बाजूला लावत पायीच अंबाडा तलाव गाठला. यातील चार युवक पोहण्यासाठी तलावात उतरले. येथे मौजमस्ती करता करता चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यापैकी अभिनव जिचकार याने प्रणय वासनिक याला बाहेर खिचून वाचविले. पण निसर्ग व कुणाल यांचा बुडून मृत्यू झाला. निसर्गचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांनी बाहेर काढला. पण वृत लिहीत पर्यंत मात्र कुणालचा मृतदेह मिळाला नव्हता. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला यावेळी पाचारण करण्यात आले. पण त्यांनाही एक मृतदेह मिळाला नाही. त्यांचे प्रयत्न सुरु आहे. निसर्ग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालय रवाना करण्यात आला. घटनेचा तपास तपास पीएसआय शिवाजी बोरकर,पोलीस शिपाई संतोष मारबते करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू