शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या मिथिलाचा ‘आयक्यू’ गुगलवर भारी, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 08:38 IST

मिथिलाची स्मरणशक्ती प्रचंड असल्याने २ वर्षांच्या वयातच या चिमुकलीचे नाव इंडिया बुकमध्ये या रेकॉर्डसाठी नोंदविले आहे.  

नागपूर : स्वातंत्र्य समरात शहीद झालेल्या सैनिकांचे फोटो बघून आपण २० किंवा ३० आणि   जास्तीत जास्त ५० लोकांना ओळखू शकू. गुगलवरही त्यांना शोधले तर १०० पेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिक भेटणार नाहीत; पण डायमंडनगर येथे राहणारी २ वर्षे २ महिन्यांची मिथिला तब्बल ११५ स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो  बघताच त्यांचे नाव सांगते. मिथिलाची स्मरणशक्ती प्रचंड असल्याने २ वर्षांच्या वयातच या चिमुकलीचे नाव इंडिया बुकमध्ये या रेकॉर्डसाठी नोंदविले आहे.  अद्याप शिशु शाळेचेही तोंड न पाहिलेल्या या मुलीच्या स्मरणशक्तींने अवघे विश्व अचंबित झाले आहे.

जगातील १०० हून अधिक देशांची राजधानीसह ओळख मिथिला पीयूष तेलरांधे या चिमुकलीने सध्या २ वर्षे २ महिन्यांत ८४ स्वातंत्र्यसैनिकांना ओळखण्याचा विक्रम केला आहे. तिच्या विक्रमाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही मान्यता दिली असून, नुकताच दिल्लीत तिचा सत्कार करण्यात आला.विक्रम ८४ स्वातंत्र्यसैनिक ओळखण्याचा असला तरी आजच्या तारखेला तिला ११५ स्वातंत्र्यसैनिक, २१ परमवीर चक्र विजेते, जगातील १०० हून अधिक देशांची ओळख व त्यांच्या राजधानी ती सांगू शकते.तसेच हिंदी आणि मराठीत किमान १५ गाणी तिला तोंडपाठ आहेत. मिथिलाचे वडील आरबीआयमध्ये एजीएम आहेत तर आई डॉ. दीप्ती तेलरांधे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. 

अशी वाढली स्मरणशक्तीमिथिलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे ध्येय तिला मोबाइल फोनपासून दूर ठेवण्याचे होते.  हे साध्य करण्यासाठी त्यांनी तिला खेळाच्या स्वरूपात पुस्तके, चित्रे दाखवायला सुरुवात केली. त्याला तिने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या-ज्या गोष्टी तिला शिकविल्या त्या सर्व गोष्टी ती आठवत होती. त्यामुळे तिची स्मरणशक्ती विकसित होत गेली.प्रत्येक मूल जन्मतःच प्रतिभा घेऊन येते आणि मुलांना पुरेसा वेळ देऊन त्या प्रतिभेला वाव देणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. सर्व पालकांनी मुलांच्या नित्यक्रमातून मोबाइल काढून त्यांना पुस्तकांच्या जवळ आणल्यास हा चमत्कार सहज घडू शकतो.

टॅग्स :nagpurनागपूर