शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू,दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 20:07 IST

कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या बुटीबोरी येथील सनविजय रोलिंग मिलमधील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बुटीबोरी) : कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सनविजय रोलिंग मिलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. हरिशंकर भलावी (३०) रा. विजना, जि. शिवनी, कैलास भलावी (२५) रा.मंडवा, जि. शिवनी, मध्यप्रदेश अशी मृत कामगारांची नावे आहेत. या अपघातातील विजय पराते (१९) व पंजी कौरती (२०) दोघेही रा.महुवाटोला, जि.शिवनी या दोघांची प्रकृती गंभीर आहे.स्थानिक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार हरिशंकर भलावी व कैलास भलावी हे दोन्ही कामगार कंपनीतील ‘गॅसी फायर’ला स्वच्छ करण्याचे काम करीत होते. दोन्ही कामगार बराच वेळ होऊन बाहेर न आल्यामुळे विजय आणि पंजी त्यांना पाहण्यासाठी पाईप लाईनमध्ये शिरले. त्यांचाही जीव गुदमरल्यागत झाल्याने ते बाहेर आले. हरिशंकर आणि कैलास तिथे पडून असल्याची माहिती त्यांनी इतर कामगारांना दिली. कंपनीतील कामगारांनी लगेच ‘गॅसी फायर’ कडे धाव घेतली. कामगारांनी त्यांना बाहेर काढून बुटीबोरी येथील माया हॉस्पिटलला भरती केले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान हरिशंकर व कैलास यांना मृत घोषित केले. विजय पराते व पंजी कौरतीवर उपचार सुरू आहेत.‘गॅसी फायर’मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायआॅक्साईड या वायूची गळती झाल्याने कामगारांना काम करताना पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने ही घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरील कामगारांनी दिली. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी कंपनीत दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला.तर वाचला असता जीवधोकादायक ठिकाणी काम करताना कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होणे गरजेचे होते. सनविजय रोलिंग मिलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यासोबतच कंत्राटदारानेसुद्धा आपल्या कामगारांना सुरक्षा साधने का दिली नाही, अशी विचारणा कामगारांकडून केली जात आहे. या घटनेसाठी जबाबदार कंपनी व्यवस्थापन व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.कंत्राटदार, फोरमनवर गुन्हा दाखलएमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फोरमन हरदेवसिंग प्रेमसिंग बामरा, विजेंद्रसिंग रामरजून कुशवाह व कंत्राटदार ब्रिजेश वीरेंद्र पाठक यांच्यावर भादंविच्या कलम २८७, ३३७, ३३८ व ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू