शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

By admin | Updated: February 24, 2015 02:22 IST

स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. मंगळवारी आणखी दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला.

नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. मंगळवारी आणखी दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूने ४३ रुग्णांचे बळी घेतले असून, आज १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या २२७ झाली आहे. शोभा शेंडे (४०) रा. कैलासनगर व वैशाली चौधरी (३४) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शोभा शेंडे या आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लू संशयित म्हणून भरती झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.वैशाली चौधरी ही महिला २० फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती झाली. २२ फेब्रुवारीला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. आज सायंकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १५७, नागपूर ग्रामीणमध्ये २१, वर्ध्यासह इतर जिल्ह्यांत २४, अकोल्यातील तीन तर इतर मध्य प्रदेशातील २१ तर आंध्र प्रदेशातील एका रुग्णाला, असे एकूण २२७ रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात आतापर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर ग्रामीणसह इतर जिल्हे आणि राज्यातील अशा एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढती आकडेवारी पाहता प्रशासन अद्यापही युद्धपातळीवर उपाययोजना करीत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)मनपाकडे केवळ ५०० गोळ्या शिल्लक४स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वाईन फ्लूचा उद्रेक होऊन दोन महिने होत असतानाही आरोग्य विभाग बैठकीतच अडकून आहे. मंत्री आणि अधिकारी आश्वासनापलीकडे काहीच करीत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग बघण्याच्या भूमिकेत आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास मेयो, मेडिकलला रेफर, कागदोपत्री जनजागृती आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण यापलीकडे मनपाकडे काम नाही. आतातर मनपाकडे केवळ ५०० गोळ्या शिल्लक असल्याची माहिती आहे.