कन्हान : वेकाेलिच्या डम्पिंग यार्डजवळ उभी ठेवलेली पंक्चर दुचाकी चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटराेहणा शिवारात घडली.
रामबचन रामकिसन प्रसाद (४८, रा. शिवनगर, कांद्री, कन्हान, ता. पारशिवनी) हे त्यांच्या एमएच-४०/एएफ-८८८७ क्रमांकाच्या दुचाकीने कन्हानला येत होते. मध्येच ती पंक्चर झाली. त्यांनी ती घाटराेहणा शिवारातील वेकाेलिच्या डम्पिंग यार्डजवळ उभी ठेवली हाेती. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने ती चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. दुचाकीची किंमत ३० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार जाेसेफ करीत आहेत.