शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:21 IST

नायलॉनचा मांजा सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मांजाला कुठे तरी आवर घातला जावा अशी भावना जनसामान्यात व्यक्त होत असताना, आणखी एक इसम जखमी झाला. गळा कापल्याने तब्बल २२ टाके लागले.

ठळक मुद्देनागपूरकरांनो सावधानता बाळगा२२ टाके घालावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नायलॉनचा मांजा सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मांजाला कुठे तरी आवर घातला जावा अशी भावना जनसामान्यात व्यक्त होत असताना, आणखी एक इसम जखमी झाला. गळा कापल्याने तब्बल २२ टाके लागले. इसमाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने घरीच उपचार सुरू आहेत.विनोद बोंधाडे (४४) रा. गजानन, ओंकारनगर असे त्या जखमी इसमाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी रोजी विनोद आपल्या स्टेशनरी दुकानात दुचाकीवरून जात होते. सकाळी १०.१५ वाजता ओंकारनगर शताब्दी चौक मार्गावर अचानक नायलॉनचा मांजा आडवा आला. काही कळण्याच्या आत गळा कापला गेला. हाताने मांजा दूर करीत असताना हाताची बोटे कापल्या गेली. गळ्याला रक्ताची धार लागली. एका हाताने गळ्यावर रुमाल धरून दुसऱ्या हाताने त्यांनी दुचाकी घराकडे वळविली. परंतु काही दूर अंतरावर गेले असता तोल जाऊन खाली पडले. त्याच वेळी एका तरुणाने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तातडीने २२ टाके लावले. अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु एक दिवसाचा खर्च २५ हजार रुपये असल्याने आणि विनोद यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी सुटी घेतली. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. जीव धोक्यात आल्याने व आर्थिक फटका बसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.कधी होणार कारवाई?मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर केवळ मकरसंक्रांतीच्या काळात बंदी न लादता सरसकट वर्षभर बंदी लादण्यात आली आहे. याअंतर्गत नायलॉन मांजाचे उत्पादन, साठा, विक्री करणाऱ्यासह वापरणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. मात्र, त्यानंतरही लपून विक्री होत असल्याने पतंगबाजांच्या हातात नायलॉन मांजा दिसून येत आहे. या मांजामुळे रस्त्यावरून रहदारी करणारे दुचाकीस्वार जखमी होत असल्याने कधी होणार कारवाई, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

 

टॅग्स :Accidentअपघात