शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील मकरधोकडा तलावात दोघाना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:26 IST

उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देउमरेड तालुक्यातील घटना : दोन्ही तरुण नागपूरचे रहिवासी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर (उमरेड) : तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. अन्य चार मित्रसुद्धा त्यांच्या सोबतीला होते अशीही बाब समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उमरेड येथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मकरधोकडा तलाव परिसरात नागपूर येथील सहा तरुण दुचाकी वाहनाने पोहोचले. सहा जणांपैकी रोहित गोंडाने आणि कौशिक लारोकर दोघे जण काही अंतरावर शौचास बसले. शौचविधी उरकवत असताना रोहित तलावात असलेल्या खोल खड्ड्यात बुडाला. अशातच कौशिकने आपल्या अन्य मित्रांना आवाज दिला. एकमेकांचा हात हातात घेत रोहितला वाचविण्याच्या प्रयत्नात कौशिकही या खड्ड्यात बुडाला. दोघांनाही जलसमाधी मिळाली. दोघांनाही वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न चौघांनीही केला. तोपर्यंत उशीर झाला होता. उमरेड पोलीस ठाण्यात २ वाजून ४५ मिनिटांनी याबाबत माहिती मिळाली. काही मासेमारी करणाऱ्या लोकांकडून प्रेत शोधण्याचे कार्य करण्यात आले. काही तासाच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोघांचेही प्रेत मिळाले. उमरेड पोलीस ठाण्यात सदर घटनेचा मर्ग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली.

मित्रांनी प्रयत्न केलाया संपूर्ण घटनाक्रमात आधी रोहित त्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कौशिकचा बळी गेला. सोबतच मिहीर रमेश चावला (१८), अतुल वसंता धार्मिक (२६), हर्ष राजेश राहाटे (१८), आर्यन सुनील सहारे (१६) चौघेही सर्व रा. शांतिनगर नागपूर हे सुद्धा मकरधोकडा येथे होते. चौघांनीही शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यात ते विफल ठरले. मकरधोकडा तलावातील या परिसरात पंप हाऊस आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी याठिकाणी खोल खड्डा आहे. या खड्ड्यातच दोन्ही तरुणांचा हकनाक जीव गेला. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर