शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नजीक अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:39 IST

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी अर्थात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमोहगाव (झिल्पी) तलावातील घटना : पोहण्याचा मोह जीवावर बेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी अर्थात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.सिद्धेश लक्ष्मीनारायण माळोदे (२०, रा. श्रीहरीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) व मंथन मधुकर मंदारधरे (२०, रा. ऊर्जानगर, चंद्रपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सिद्धेश व मंथन वानाडोंगरी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीईच्या प्रथम वर्षाला होते. मंथन हा वानाडोंगरी येथे राहायचा. ते त्यांच्या अन्य तीन मित्रांसोबत दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते.सर्वांनी मौजमस्ती केल्यानंतर सिद्धेश व मंथन तलावात पोहण्यासाठी उतरले. वास्तवात, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांनी इतर तिघांनाही पोहण्याचा आग्रह केला; मात्र तिघांनी त्यांना नकार देत काठावर बसणे पसंत केले. दरम्यान, दोघेही खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब लक्षात येताच काठावरील तिघांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी, तिघांनी आरडाओरड केल्याने शिवारातील नागरिक गोळा झाले.काहींनी या घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही पाण्यात शोध घेतला. दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.---कुप्रसिद्ध तलावमोहगाव (झिल्पी) शिवारातील हा तलाव मृत्यूसाठी कुप्रसिद्ध मानला जातो. या तलावात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नागपूर येथील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता पाटबंधारे विभागाने या तलावाच्या काठावर मोठा सूचना फलक लावला आहे. या तलावात आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणीही उतरू नये, असे आवाहन या सूचना फलकाद्वारे पाटबंधारे विभागाने केले आहे. मात्र, हौशी मंडळी या सूचनेकडे सपशेल डोळेझाक करतात आणि तलावात पोहण्यासाठी उतरतात. त्यातूनच दुर्दैवी घटना घडतात.***

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू