शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 17:15 IST

Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली.

नागपूर: झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी मोठी बहीण तिच्या मागे गेली. त्यातच लहान बहिणीचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. त्या दोघींनाही वाचविण्यासाठी परिसरात कुणीही नसल्याने त्या दोघींचाही बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी घडली असून, सोमवारी (दि. ४) सकाळी उघडकीस आली.आराध्या विचारकर मांढरे (२) व आकांक्षा विचारकर मांढरे (५) रा. शिकारपूर, ता. कुही अशी बहिणींची नावे आहेत. विचारकर मांढरे यांच्याकडे शेती अथवा उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. विचारकर व त्यांची पत्नी रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. आराध्या व आकांक्षा त्यांच्या आजोबासोबत घरी होत्या. सायंकाळच्या सुमारास आजोबा काही कामानिमित्त गावात गेल्याने दोघीही घरासमोर खेळत होत्या.दरम्यान, खेळता-खेळता आराध्या तलावाच्या काठावर गेली. तिला आणण्यासाठी आकांक्षा तिच्या मागे गेली. तलावाच्या काठावर ओली माती असल्याने आराध्याचा पाय घसरला व ती तलावातील पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी आकांक्षा पुढे सरसावली व पाय घसरल्याने तीही पाण्यात पडली. घटनेच्यावेळी तलावाजवळ कुणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघी पाण्यात पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.काही वेळाने आजोबा घरी आल्यावर त्यांना दोघीही झोपडीत अथवा अंगणात दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोघीही तलावात बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांना बोलावले. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीतेश डोर्लीकर व यादवराव कुंभरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर दोघींच्याही पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.तलावाच्या काठी झोपडीशिकारपूर गावापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठी त्यांनी झोपडी बांधली असून, त्यात त्यांचे म्हातारे वडील, पत्नी व दोन मुलींसोबत वास्तव्य आहे. त्यांच्या झोपडीच्या परिसरात दुसरी झोपडी अथवा घर नाही. त्यांना आराध्या व आकांक्षा या दोनच मुली होत्या. घटनेची माहिती मिळताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. एकाचवेळी दोघींचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यू