शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाईक चोरून पळाले दोन मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:05 IST

भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देनागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील पहिलीच घटना : ते मनोरुग्ण कसे? उपस्थित केले जात आहे प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिंत ओलांडून मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी नव्या नाहीत. परंतु नियोजन करून बाईक चोरून पळून जाण्याची पहिलीच घटना मंगळवारी उघडकीस आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हे रुग्ण खरंच मनोरुग्ण होते काय, याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून दरवर्षी चार-पाच रुग्ण पळून जायचे, परंतु शासन याकडे लक्ष देत नव्हते. अखेर आमदार तारासिंग यांना या विषयाला घेऊन अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करावे लागले. परिणामी, रुग्ण पळून जाण्यासाठी कारणीभूत ठरत असलेली कमी उंचीच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी एक कोटी आठ लाखांचा निधी मिळाला. सहा फुटाची भिंत १२ फुटाची झाली. भिंत ओलांडून पळून जाण्याच्या घटना बंद झाल्या. परंतु सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन मुख्य प्रवेशद्वारातून पळण्याच्या घटना घडल्या. रुग्ण पळण्याच्या घटनेला रुग्णालय प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने मंगळवारी पुन्हा अशीच घटना घडली. असे पळाले रुग्णसूत्रानुसार, गांजाच्या आहारी जाऊन मानसिक स्थितीवर परिणाम झालेल्या रामेश्वरी नागपूर येथील २८ वर्षीय युवकाला व ३८ वर्षीय चंद्रपूर येथील एका इसमाला न्यायालयाच्या निर्देशानुसार १० दिवसांपूर्वीच मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉर्ड क्र. ८ मध्ये या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास गजानन नाडेकर नावाचा रुग्णालयाचा स्वयंपाकी सकाळचा नाश्ता व दुपारच्या भोजनाची तयारी करण्यासाठी आला. त्याने स्वयंपाकगृहासमोर बाईक उभी केली. याच दरम्यान या दोन्ही मनोरुग्णांनी ती बाईक चोरून धूम ठोकली. विशेष म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडेपर्यंत कुणीच अडविले नाही. येथून ते रामेश्वरी येथील एकाच्या घरी आले, कपडे बदलविले, पैसे घेतले आणि परत त्याच बाईकने पळाले. रस्त्यात बाईकमधील पेट्रोल संपल्याने ती तिथेच टाकून पसार झाले.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयtheftचोरी