शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महारेरातून दोन प्रकल्प होणार डी-लिस्ट; आक्षेप घेण्यास १५ दिवसांचा कालावधी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 8, 2023 13:53 IST

मुदतीच्या आत प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर

नागपूर : मुदतीच्या आत आणि वाढीव मुदत मिळाल्यानंतरही बांधकाम प्रकल्प पूर्ण न करणाऱ्यांवर महारेराने करवाई केली आहे. त्यात महारेरा नागपूर विभागात दोन प्रकल्प डी-लिस्ट केल्याची माहिती आहे.

महारेराने १० फेब्रुवारीला परिपत्रक जारी करून काही धोरणात्मक निर्णयाची घोषणा केली होती. त्यानुसार अटी आणि शर्तींच्या आधारे प्रकल्पाची नोंदणी रद्द करता येऊ शकते. माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील ८८ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव महारेराला प्राप्त झाला आहे. यामध्ये नागपुरातील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. त्यात मिहान येथील मोराज वॉटरफॉल गेटवे रिव्हर ब्लॉक आणि तामीन कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड लँड डेव्हलपर्सच्या तामीन कॅस्टल प्रकल्पाचा समावेश आहे. नोंदणी रद्द करण्यावर आक्षेप असलेल्या कंपनीला १५ दिवसांच्या आत आक्षेप महारेराकडे पाठविता येणार आहे.

एकूण ८८ प्रकल्पांमध्ये पुण्यात ३९, रायगड १५, ठाणे ८, मुंबई शहर ४, सिंधुदुर्ग ३, पालघर ३, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, सातारा, मुंबई उपनगरात प्रत्येकी २, कोल्हापूर १ आदींचा समावेश आहे. याशिवाय नांदेड, लातूर, रत्नागिरी आणि दादरा नगर हवेली येथील प्रकल्पांचा समावेश आहे. काही डेव्हलपर्सकडे नोंदणीकृत संख्येसह अनेक टप्प्यांच्या बांधकामाचे प्रकल्प असतात. त्यातील काही टप्पे पूर्ण झाले आहेत. काही टप्प्यांना पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. जर कोणत्याही प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याविरुद्ध तक्रार आली तर महारेरा सर्वप्रथम संबंधित डेव्हलपर्सला नोटीस पाठवून तक्रार समजवून घेते.

महारेराने प्रकल्प डी-लिस्ट केल्यास फ्लॅट विक्रीची मुभा कंपनीला राहणार नाही. मुदत देऊनही प्रकल्प पूर्ण न केलेल्या भरपूर केसेस आहेत. याशिवाय प्रकल्प पूर्ण केलेल्या राज्यातील जवळपास ४०० हून अधिक बिल्डर्सनी प्रकल्पाच्या डी-लिस्टसाठी अर्ज केले आहेत. काहींचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि ओसीही मिळाली आहे.

- प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र मेट्रो

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर