शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी येथे ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:15 IST

महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या युनिटची जागा घेणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे यांची घोषणा : नागभीड ते कोराडीपर्यंत ब्रॉडगेज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या युनिटची जागा घेणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ३५ वर्षे जुने झालेले वीज युनिट सुपर क्रिटीकल युनिटमध्ये परावर्तित करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाच पालन करीत कोराडी येथे नवीन युनिट तयार केले जात आहे. त्यांनी सांगितले की, कोळसा वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने चंद्रपूरच्या नागभीड येथून कोराडीपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकण्यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. दीड वर्षात ही लाईन तयार केली जाईल. सध्या नागभीडवरून कोळशाची रॅक बुटीबोरी मार्गे येथे येते. यात २२ तास लागतात. थेट रेल्वे लाईनमुळे हे अंतर केवळ ४ तासाचे होईल.तसेच बावनकुळे यांनी कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठ्यासाठी नवीन योजनांचीही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी वेकोलि पाणी उपलब्ध करेल. यासंदर्भात दोघांमध्ये करार झाला आहे. त्याचप्रकारे कोराडीला पाणी उपलब्ध करण्यासाठी पिवळ्या नदीतील पाण्याचा उपयोग केला जाईल. यासाठी उप्पलवाडी येथून कोराडीसाठी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या माध्यमातून पिवळ्या नदीतून कोराडी औष्णिक वीज केंद्राला ६० एमएलडी पाणी मिळेल.४७ लाख कृषी पंप सोलरशी जुळतीलबावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत राज्यातील ४७ लाख कृषी पंपांना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर आणले जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात देशात सर्वात पुढे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्यात १५०० मेगावॅट सौर ऊर्जा, ३५० मेगावॅट पवन ऊर्जा, १००० मेगवॅट क्षमतेचे कोजेन प्रोजेक्ट आहेत. त्याचप्रकारे इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी राज्यात र्चाजिंग स्टेशन स्थापित केले जात आहे.

 

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेelectricityवीज