नागपूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची जहांगीर आर्ट गॅलरीच्या शो साठी निवड

By आनंद डेकाटे | Published: June 30, 2023 05:55 PM2023-06-30T17:55:58+5:302023-06-30T17:57:54+5:30

मुंबई येथील प्रतिष्ठित अशी जहांगीर आर्ट गॅलरी हे खास विद्यार्थ्यांसाठी मान्सून आर्ट शोचे आयोजन करते.

Two Nagpur University students' artworks selected for Jahangir Art Gallery show | नागपूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची जहांगीर आर्ट गॅलरीच्या शो साठी निवड

नागपूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची जहांगीर आर्ट गॅलरीच्या शो साठी निवड

googlenewsNext

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातील दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची मुंबई येथील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीच्या शोसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला आहे.

मुंबई येथील प्रतिष्ठित अशी जहांगीर आर्ट गॅलरी हे खास विद्यार्थ्यांसाठी मान्सून आर्ट शोचे आयोजन करते. यावर्षी एक जुलै ते १० जुलै दरम्यान मान्सून आर्ट शो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातील विद्यार्थिनी ऐश्वर्या मंडरे व नेहा झोडे यांच्या कलाकृती झळकणार आहे.

उत्कृष्ट कलाकृती निर्माण करण्याकरिता ललित कला विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात यांचे या विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळाले आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित अशा जहांगीर आर्ट गॅलरी मधील मान्सून शो करिता ललित कला विभागातील दोन विद्यार्थिनींची निवड करण्यात आल्याने विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला आहे.

Web Title: Two Nagpur University students' artworks selected for Jahangir Art Gallery show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.