शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हिट ॲंड रनच्या आणखी दोन घटना, दोघांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: July 9, 2024 16:09 IST

Nagpur : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत हिट ॲंड रनच्या घटना सुरूच असून दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. कपिलनगर व वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले.

पहिला अपघात कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. भावेश रविंद्र भरणे (२७, विदर्भ कॉम्प्लेक्स, संगम टॉकीजजवळ) हा बारा वाजताच्या सुमारास मोटारसायकलने कामगार नगर चौकाजवळील पेट्रोल पंपासमोरून जात असताना एमएच ४० सीटी ४५६६ या क्रमांकाच्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. टिप्परचालक राधेश्याम हिरालाल रहांगडाले (५३, कांद्री, कन्हान) हा वेगाने टिप्पर चालवत होता व त्यामुळे भावेश खाली पडला. अपघातानंतर राधेश्याव घटनास्थळावरून फरार झाला. भावेशला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा भाऊ कार्तिक याच्या सूचनेवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वर्षीय मुलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरविलेभावेशला दोन वर्षांची मुलगी असून या अपघातामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. काम आटोपून परत येतो असे सांगून भावेश निघाला होता. त्याने भावाला मोबाईलमध्ये रिचार्ज करून देण्यासाठी फोनदेखील केला होता व त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

रस्ता ओलांडताना गेला जीव

दुसरा अपघात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्रकाश अशोक महंत (२९, तुलसीनगर, भांडेवाडी) हा त्याच्या दुचाकीने घराबाहेर निघाला होता. तरोडी खुर्द येथील उड्डाणपुलावर दुचाकी उभी करून पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. प्रकाशला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा भाऊ राकेश याच्या तक्ररीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर