शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात आणखी दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:26 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी संबंधित प्रकरणी चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविशेष तपास पथकाची कारवाई : निविदेचे मूल्य वाढविल्याचे उघड

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी संबंधित प्रकरणी चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते व वसंत गोन्नाडे, तत्कालीन विभागीय लेखाधिकारी चंदन जीभकाटे व अरविंद जीभकाटे यांच्यासह तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप पोहेकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात अप क्र. २५१/१८ कमल १३ (१) (क), (ड) सह १३ (२)ला.प्र. कायदा १९९८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राज्य सरकारने सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी चौकशी वेगाने पूर्ण करण्यासाठी २७ एप्रिल २०१८ रोजी दोन विशेष पथकांची स्थापना केली होती. यापैकी एक पथक नागपूरला व दुसरे अमरावतीला नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर येथील विशेष तपास पथकाने मंगळवारी (१७ जुलै) संबंधित गैरव्यवहाराची उघड चौकशी करण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांना दिले. चौकशीदरम्यान निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे व त्यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाºयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा २ संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदा कामाचे मूल्य वाढविण्यात आले. कार्यकारी संचालक यांनी त्याला मंजुरी दिली. याबाबत चौकशी केली असता तसे सिद्ध झाले.सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याचे काम गोसीखुर्द (बुज) उपसा सिंचन योजनेच्या सिंदपुरी मुख्य कालव्याचे कि.मी १.९२ मधील तसेच शेंद्री शाखा कालव्याच्या कि.मी. १ ते २.५६ मधील माजी कामासह पेव्हर मशीन व बॅचिंग प्लॉटद्वारे अस्तरीकरण व त्यावरील बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्यावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविण्यात आल्याचे व त्याला मंजुरीही दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार