लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.रेल्वेस्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्लॅटफार्म क्रमांक १ वर शुक्रवारी रात्री ९.५५ वाजता आलेल्या अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधून उतरून एक व्यक्ती संशयास्पदरीत्या पळताना आढळला. त्याला पकडून चौकशी केली असता त्याने आपले नाव बाबू गणपत काळे (२०) रा. औरंगाबाद असे सांगितले. नागपूर रेल्वेस्थानकावर येण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याआधारे त्याला आरपीएफ ठाण्यात आणून त्याची कसून तपासणी करण्यात आली. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळला. याबाबत त्याने अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. दुसºया घटनेत शनिवारी पहाटे ५ वाजता आरपीएफचे जवान गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत वेटिंग हॉलमध्ये आढळला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव एकरामुल हक अमरुल्लाह अन्सारी (२४) रा. बिहार असे सांगितले. आरपीएफ ठाण्यात त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आढळला. संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली त्याने दिली. संबंधित मोबाईल क्रमांकावरून कॉल केला असता तो मोहम्मद मोज यांचा असल्याची माहिती मिळाली. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले...........
नागपूर रेल्वेस्थानकावर दोन मोबाईल चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:46 IST
रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दोन मोबाईल चोरट्यांना अटक
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन