शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांचा उशीर विद्यार्थिनीला भोवला  : परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 01:21 IST

‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही.

ठळक मुद्दे‘सीबीएसई’च्या नियमांचे पालन न केल्याचा फटका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांकडून तिला दिलासा देण्यात आला नाही व नाईलाजाने तिला पेपर न देताच वापस जावे लागले.परीक्षा केंद्रावर कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांनी दहा किंवा त्या अगोदर पोहोचावे असे निर्देश ‘सीबीएसई’ने अगोदरच दिले आहेत. गुरुवारी दहावीचा गणिताचा पेपर होता. शहरातील एका परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजून २ मिनिटांनी विद्यार्थिनी तिच्या पालकांसह पोहोचली. उशिरा आल्याचे कारण देत सुरक्षा रक्षकांनी तिला प्रवेश नाकारला. तिच्यासह इतर पालकांनी केंद्र चालकांना विनंती केली. कॉटन मार्केट चौकात अपघात झाल्यामुळे उशीर झाला असल्याचे पालकांनी सांगितले. परंतु केंद्रावर नियमांचा हवाला देत तिला परीक्षेला बसू दिले नाही.निर्धारित वेळेपेक्षा उशिराने आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही, हे ‘सीबीएसई’ने परीक्षा प्रवेशपत्रांवर स्पष्ट केले आहे. संंबंधित विद्याथिर्नी पेपर सुरू झाल्यानंतर आली. त्यामुळे तिला परीक्षा देता येणार नाही. जर तिला परीक्षेला बसू दिले तर तो नियमांचा भंग ठरेल, असे ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक सौरभ भारद्वाज यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी