शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

दोन लाख बेरोजगारांची फौज

By admin | Updated: October 25, 2015 02:56 IST

उपराजधानीत ‘स्मार्ट सिटी’चे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याचवेळी भविष्यातील या ‘स्मार्ट सिटीत’ १ लाख ९० हजार ९४५ बेरोजगार तरुणांची फौज रोजगाराच्या शोधात पायपिट करीत आहे.

उपराजधानीत हव्यात रोजगाराच्या संधी : कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा नागपूर : उपराजधानीत ‘स्मार्ट सिटी’चे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याचवेळी भविष्यातील या ‘स्मार्ट सिटीत’ १ लाख ९० हजार ९४५ बेरोजगार तरुणांची फौज रोजगाराच्या शोधात पायपिट करीत आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय कुठलेही शहर स्मार्ट होऊ शकत नाही, हे विसरता येणार नाही. या बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावर विचार होणे आवश्यक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे (पूर्वीचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र) नोंदणीकृत या बेरोजगारांमध्ये १ लाख २७ हजार १४४ मुले व ६३ हजार ७८१ मुलींचा समावेश आहे. रोजगाराच्या संधी थेट तरुणांपर्यंत पोहोचाव्या यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे बेरोजगार तरुणांची नोंदणी केली जाते. यासाठी केंद्राने आॅनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार वयाचे १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही बेरोजगाराला या केंद्राकडे नोंदणी करता येते. यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधींची माहिती दिली जाते. त्यानुसार मागील २००८ ते २०१२ या पाच वर्षांत एकूण ३६ लाख ५ हजार ९४४ बेरोजगार तरुणांची येथे नोंदणी झाली. त्यापैकी ६ लाख ९० हजार ७२२ तरुणांना रोजगार मिळाला. दुसरीकडे या काळात मार्गदर्शन केंद्राकडे सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे १३ हजार २९५ व खाजगी क्षेत्रातील ३५ हजार ४२२ उद्योजकांची यादी उपलब्ध होती. त्याचवेळी ८३ हजार ९१५ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ४ हजार ९८० तरुणांना रोजगार मिळाला. सोबतच केंद्रातर्फे ६२१ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी ५९ हजार ८५४ तरुणांची निवड करण्यात आली होती. शिवाय या सर्व मेळाव्यांवर सुमारे ६३ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च झाला. याच दरम्यान आदिवासी तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असून, त्यानुसार ११२ कार्यक्रम झाले. त्यासाठी ४ हजार ३०९ तरुणांची निवड करू न त्यापैकी ३ हजार ३१७ तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण करून ३४६ तरुणांना रोजगार मिळाला. (प्रतिनिधी)