लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वस्तीतील दोघांनी एका युवकाला पळवून नेल्याने रामनगर तेलंगखेडी परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे बेपत्ता युवकाचे नाव असून, तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोर्स जवळ राहतो.याच वस्तीत राहणारे संतोष परतेकी (वय ३२) आणिं त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी मंगळवारी सकाळी १० वाजता कुणाल तसेच त्याचा मित्र आकाश पाल या दोघांना फिरायला जाऊ, असे सांगून सोबत नेले. आधी सीताबर्डी, नंतर भिवसनखोरी गिट्टीखदान आणि त्यानंतर सायंकाळी ते वाडी परिसरात गेले. या तीनही ठिकाणी आरोपी आणि कुणाल यथेच्छ दारू पिले. दारूच्या नशेत टून्न झालेले हे तिघे नंतर कुठे निघून गेले कळायला मार्ग नाही. आकाश पाल मात्र त्याच्या घरी परतला. त्याने कुणालचा भाऊ विशाल शालीकराम चचाणे (वय २०) याला हा प्रकार सांगितला. विशालने रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, कुणाल किंवा आरोपी परतेकी बंधूपैकी कुणाचाच पत्ता लागला नाही. त्यामुळे रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय एन. डी. शेख यांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता कुणालसह आरोपींचा शोध घेतला जात आहे.---
नागपुरात दोघांनी केले युवकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 19:49 IST
वस्तीतील दोघांनी एका युवकाला पळवून नेल्याने रामनगर तेलंगखेडी परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे बेपत्ता युवकाचे नाव असून, तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टोर्स जवळ राहतो.
नागपुरात दोघांनी केले युवकाचे अपहरण
ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल : पोलिसांची शोधाशोध सुरू