शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जरीपटक्यात दोन गटात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:26 IST

दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देतोडफोड करून घराला लावली आग : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चालला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.जरीपटक्यातील आंबेडकरनगरात राहणारा गौरव नितीन नितनवरे (वय २०) याच्यासोबत दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या मुद्यावरून रोहित पाटील, रजत नानेट, कुणाल डोंगरे यांचा सोमवारी रात्री वाद झाला. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिल्यामुळे गौरवने त्याच्या आईसह जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून मध्यरात्री ते घरी परतले. हे माहीत झाल्याने मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास आरोपी पाटील, नानेट आणि डोंगरेने नितनवरेच्या घरावर हल्ला करून त्यांच्या घराला आग लावली. या जाळपोळीमुळे नितनवरे यांच्या घरातील साहित्य जळाले. त्याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सोनू ऊर्फ अभिजित नितीन नितनवरे, गौरव नितीन नितनवरे, मल्ला ऊर्फ आयुष विनोद मेश्राम, रितीक रोशन ठवरे आणि त्यांचे दोन साथीदार हातात चाकू, तलवार घेऊन अशोक किसन पाटील (रा. लुंबिनीनगर) यांच्या घरावर चालून आले.रोहित पाटील कहां हैं, अशी विचारणा करीत त्यांनी अशोक पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे घरात शिरून आतमधील साहित्याची तोडफोड करीत फेकाफेक केली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गौरव नितीन नितनवरे (वय २०) याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पाटीलच्या गटातील तर पाटील यांच्या तक्रारीवरून नितनवरेच्या गटातील उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर