शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  कळमना पोलिसांनी केले दोन धान्य गोदाम सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:01 IST

कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरील सावळी व कळमना येथील दोन धान्याचे गोदाम सील केले.

ठळक मुद्देसरकारी तांदळाच्या प्रकरणात चालक व क्लिनरला दोन दिवसाचा पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरील सावळी व कळमना येथील दोन धान्याचे गोदाम सील केले. अद्यापतरी गोदामात ठेवलेल्या धान्याची पोती आपली असल्याचा दावा कुठल्याच व्यापाऱ्यांनी केला नाही.डीसीपी बावचे यांना ट्रक क्र. एमएच-३५-के-३६५९ यात सरकारी धान्य भरून तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. या सूचनेच्या आधारे पोलिसांनी कापसी फ्लायओव्हरवर या ट्रकला थांबविले. त्यात रेशन दुकानातील तांदळाचे पोते मिळाले. ट्रक चालक अनिल गुडेकर व क्लिनर प्रल्हाद गुडेकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसाचा पीसीआर सुनावला. यांच्याकडून धान्याच्या तस्करीत सक्रिय असलेल्यांचा खुलासा होऊ शकतो, असे पोलिसांचे सांगणे आहे. शुक्रवारी रात्री विचारपूस केली असता, आरोपींनी सांगितले की कळमना नाका नंबर चारवर गोदामातून तांदळाचा ट्रक लोड केला होता. त्याचबरोबर मौदा येथील सावळीच्या गोदामातून धान्याची पोती लोड केली होती. हा माल गोंदियाला जात होता. परंतु त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. सूत्रांच्या मते पोलिसांनी तपासात या गोदामामध्ये शुक्रवारी सकाळी तांदळाची पोती आणणाऱ्या ट्रकचे नंबर मिळाले आहे. हे ट्रक कुठल्या सरकारी गोदामातून आले होते याची माहिती मिळाली आहे. काळाबाजाराचा सूत्रधार कोण?हा तांदूळ गोंदियातील एका अग्रवाल नावाच्या व्यापाºयाच्या गोदामात पोहचविण्यात येत होता. हा तांदूळ रेशन दुकान व शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वाटप करण्यासाठी होता. परंतु त्याचा काळाबाजार करून खासगी व्यापाऱ्यांना विकण्यात येत होता. या धान्याच्या काळाबाजाराचा मुख्य सूत्रधार कोण? या प्रकरणी पोलीस गांभीर्याने चौकशी करीत आहे. तीन वर्षापूर्वी लोकमतने केला होता खुलासासरकारी धान्याचा काळाबाजार कळमना येथील एका गोदामातून होत असल्याचा खुलासा तीन वर्षापूर्वी लोकमतने केला होता. यानंतर सरकारी विभागातील अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर काही राजकीय पक्षाशी जुळलेले लोक हे प्रकरण दाबण्यासाठी सक्रिय झाले होते.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर