शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन टोळ्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 02:04 IST

हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

ठळक मुद्देहुडकेश्वर व कळमना पोलिसांनी घेतले १० आरोपींना ताब्यात : शस्त्रांसह मुद्देमालही केला जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.पहिली घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगरातील आहे. येथील निंबाळकर हायस्कूलच्या बाजूला असलेल्या पडक्या घरामध्ये रात्री ११.३० च्या सुमारास काही युवक एकत्रित आले. त्यांच्याजवळ शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ६ आरोपींना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये रोशन अशोकराव काटोले (२३, रा. सौभाग्यनगर), रुचित कृष्णराव कडू (२७), अक्षय ऊर्फ दत्तू राजेश बाळबुधे (२०), यश लक्ष्मीप्रसाद भोयर (२०), साहिल ऊर्फ दही दीर्घेश्वर दहीकर (१९, रा. इंद्रनगर), सागर ऊर्फ पिचकारी राजेंद्र महात्मे (२७, रा. ब्रह्मनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी शस्त्रासह मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी रॉड, मोबाईल असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यापैकी आरोपी प्रवीण ऊर्फ चुटी चव्हाण (२३, रा. दुबेनगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.दुसरी घटना कळमना हद्दीतील कामठी रोडवर घडली. पॅट्रोलिंग करताना पोलिसांना रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका बसमध्ये हालचाल होताना दिसून आली. येथे आरोपींजवळ लोखंडी रॉड, चाकू, नायलॉन दोरी होती. पोलिसांनी येथून आरोपी हर्ष युवराज इंगोले (१८, रा. भरतवाडा रोड), स्वप्निल भीमराव मोटघरे (२७, रा. दुर्गानगर), कुलदीप ऊर्फ पैजामा सुभाष गणवीर (२५), टिपू सुल्तान अशपाक शेख (१८, रा. प्रकाशनगर) यांना अटक केली आहे. आरोपी चेतन ठाकूर, आसिफ व अन्य एक जण पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी