शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दाेन मादी बिबट्यांची गाेरेवाडा उद्यानात प्रसूती; ४ बछडे सुरक्षित, एकाचा गर्भातच मृत्यू

By निशांत वानखेडे | Updated: April 19, 2023 16:36 IST

'चिंकी'वर तातडीचे उपचार सुरू

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यानात दाेन दिवसात ‘चिंकी’ आणि ‘रूची’ या दाेन मादी बिबट्यांची प्रसूती झाली. यात रूचीने तीन बछड्यांना जन्म दिला असून ते तिन्ही सुरक्षित आहेत. दुसरीकडे चिंकीने एका शावकाला सुरक्षित जन्म दिला पण दुसऱ्याचा गर्भातच मृत्यु झाला. सध्या चिंकीवर उपचार सुरू आहेत.

गाेरेवाडा उद्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे चिंकीने दाेन बछड्यांना जन्म दिला. पहिली प्रसूती सरक्षित झाली व पिल्लाचा जन्म एकदम सुरक्षित झाला पण दुसरे गर्भातच दगावले. यादरम्यान रक्तस्राव होऊन चिंकीला संसर्ग झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पहिल्या पिल्लाला कृत्रिमरित्या संभाळले जात आहे. तिच्यानंतर साेमवारी रुची बिबटची प्रसूती झाली व तिने तिन्ही बछड्यांना सुरक्षित जन्म दिला. तिने तिन्ही पिल्लांना स्वीकारले असून ती त्यांचा व्यवस्थित संभाळ करत आहे.

या बिबट्यांची प्रसूती व्यवस्थित होणेसाठी गोरेवाडा प्रशासनाकडून विशेष काळाजी घेण्यात आली होती. दोन्ही माद्यांना स्वतंत्र बाळंतगुफा तयार करुन त्यांच्यावर सीसीटिव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्या दैनंदीन आहारासोबत विशेष आयुर्वेदीक पोषक तत्वे माद्यांना नियमित देण्यात येत होते. प्रसूतीदरम्यान प्राणिसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, पशुवैद्यक डॉ. मयुर पावशे, अभिरक्षक दिपक सावंत आणि सहा. वनसंरक्षक सारिका खोत उपस्थित होते. चिंकीच्या उपचाराकरिता वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे पशुवैद्यक डॉ. सुजित कोलंगथ यांच्या मदतीने उपचार सुरु आहेत. चिंकीच्या प्रसूतीसाठी सहकारी संतोष पायघन आणि राम नान्हे तर रुचीसाठी निलेश चिंतनवार आणि शैलेश गवळी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूरGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय