शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नागपूर हवालाकांडातील अडीच कोटी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:04 IST

हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणा-या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणा-या नागपूरच्या हवालाकांडात पोलिसांसोबत संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देभिसी गावात झाली जप्तीची कारवाई युरियाच्या पोत्यात ठेवली होती रोकड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणा-या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणा-या नागपूरच्या हवालाकांडात पोलिसांसोबत संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली.रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हवालाची रोकड घेऊन जाणाराी एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. या कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रायपूरहून (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिल्याचेही पोलीस सांगत होते. मात्र, कारमध्ये ५ कोटी, ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी, ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवाल या तरुणाने पोलिसांकडे रविवारी दिलेल्या तक्रारीतून नोंदवला होता. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. वरिष्ठांनी कसून चौकशी केली असता नंदनवन ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे याने त्याच्या मर्जीतील पोलीस कर्मचा-यांना हाताशी धरून कुख्यात गुन्हेगार सचिन नारायण पडगिलवार (वय ३७), रवी रमेश माचेवार (वय ३५), गजानन भालेनाथ मुगधुने (वय २७) आणि प्रकाश बबलू वासनिक (वय २२, सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी) यांच्याशी संगनमत करून कारमधील २ कोटी, ५४ लाख, ९२ हजार, ८०० रुपये लुटल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनीच दरोडा टाकून घेतल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. अवघ्या पोलीस दलाच्या प्रतिमेवरच काळे फासल्यासारखे झाल्याने वरिष्ठ अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेतली. रविवारपासून रात्रीचा दिवस करीत पोलिसांनी तपासकाम केले.सचिन पडगिलवार, रवी माचेवार, गजानन मुगधुने आणि प्रकाश वासनिक या चार गुन्हेगारांना सातारा पोलिसांच्या मदतीने महाबळेश्वरमध्ये बुधवारी अटक करण्यात आली. येथे आणल्यानंतर गुरुवारी त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यांनी या दरोड्यात सहभागी असलेला सहायक पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलिसांचे पाप कथन केले. त्यानंतर अली हुसेन जिवानी (वय ३६, रा. मोमिनपुरा) यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी रात्री उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला.नातेवाईकांकडे लपविली रोकडपोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे पोलीस निरीक्षक मुकूंद साळुंके यांच्या नेतृत्वात एक पोलीस पथक गुरुवारी मध्यरात्री चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी गावात पोहचले. या पथकाने पहाटे ३ वाजता आरोपी गजानन मुगधुणे याच्या नातेवाईकांच्या घरात दडवून ठेवलेली २ कोटी, ५० लाखांची रोकड जप्त केली. मुगधुने हा मुळचा भीसी येथील रहिवासी आहे. तो येथे वाहनचालक म्हणून काम करतो. आरोपींनी नोटांचे हे बंडल युरियाच्या बॅगमध्ये कोंबून ठेवले होते. ही रोकड घेऊन नागपुरात पोलीस पथक पोहचल्यानंतर ती नंदनवन ठाण्यात मोजून घेण्यात आली. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. या दरोड्याचा मास्टरमार्इंड एपीआय सोनवणे आणि अन्य दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्रीपर्यंत तो होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा