नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर खोदकामात पुन्हा सापडल्या दोन तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:41 PM2019-11-28T12:41:09+5:302019-11-28T12:42:38+5:30

शहरात ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी सकाळी खोदकाम सुरू असताना पुन्हा दोन तोफा सापडल्या आहेत.

Two canons were found at Kasturchand Park in Nagpur | नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर खोदकामात पुन्हा सापडल्या दोन तोफा

नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर खोदकामात पुन्हा सापडल्या दोन तोफा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरात ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी सकाळी खोदकाम सुरू असताना पुन्हा दोन तोफा सापडल्या आहेत. याआधीही १७ आॅक्टोबर रोजी येथे चार तोफा सापडल्या होत्या.
या तोफा २०० वर्षे जुन्या असून भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईदरम्यान भोसल्यांकडून या तोफा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर सध्या वॉकिंग ट्रॅक निर्मिती व वृक्षारोपणासह सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. याअंतर्गत पार्कवर खोदकाम सुरू आहे.
या तोफा येथे कशा आल्या संशोधनाचा विषय आहे. साधारणत: २०० वषार्पूर्वी राजे रघुजी भोसले व इंग्रजांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सीताबर्डी युद्धादरम्यान या तोफा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या तोफा लांब पल्ल्याच्या असल्याने ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीकडून बनविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कुणाकडून वापरण्यात आल्या, याबाबत संभ्रम आहे. ब्रिटीशांनी युद्धात या तोफा वापरल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Two canons were found at Kasturchand Park in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.