शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

नागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब! मॉक ड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:21 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते. सतर्कतेबाबतच्या सरावासाठी ही नियमित स्वरूपाची मॉक ड्रील होती.

ठळक मुद्देएक तासाचा अल्टिमेटम; संपूर्ण विमानतळ खाली करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते.मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विमानतळावर नेहमीप्रमाणे सामान्य परिस्थिती होती. दुपारी २.२० च्या सुमारास एअर एशियाच्या बुकिंग आॅफिस व एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया(एएआय)ला एक फोन कॉल आला. यात सांगण्यात आले की, काही व्हीव्हीआयपींना उडविण्यासाठी माओवाद्यांनी विमानतळावर दोन बॉम्ब पुरलेले आहेत. परंतु व्हीव्हीआयपींनी विमान प्रवास रद्द केल्याबाबतचा पुन्हा कॉल आला व पुरण्यात आलेल्या दोन्ही बॉम्बचा एक तासाचा स्फोट होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर संबंधित सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)च्या सशस्त्र जवानांनी मोर्चा सांभाळला. या सुरक्षा यंत्रणेचे श्वान पथकही पोहोचले. विमानतळाच्या आतील अनेक लोकांना नेमके काय सुरू आहे, याची माहिती नव्हती. यादरम्यान मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या अग्निशमन दलाचे कर्मचारी डिपार्चर गेटवर सज्ज झाले. २.३० ला पोलीस बॉम्ब शोधक पथक पोलिसांच्या मदतीला दाखल झाले. काही वेळातच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्याही आल्या.यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी शिटी वाजवून ड्रॉप अ‍ॅन्ड गो झोनपासून दूर राहण्याचे लोकांना तसेच वाहनांना दूर ठेवण्याचे सांगण्यात आले. एमआयएल, एएआय व एअरलाईन्सचे कर्मचारी प्रसंगावधान ओळखून सतर्क झाले अन् सुरक्षा जवानांसोबत कामाला लागले. सीआयएसएफच्या श्वान पथकाने २.४५ ते २.५० दरम्यान पुरून ठेवलेल्या बॉम्बचा शोध घेतला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकातील जवानांनी स्फोटक रोधक गणवेश परिधान करून बॉम्ब काढले. दोन्ही बॉम्ब निकामी केले. हा प्रकार मॉक ड्रीलचा एक भाग होता. परंतु मॉक ड्रीलची कार्रवाई पूर्ण होईपर्यंत स्थानीय प्रशासनाची अ‍ॅम्बुलन्स आली नव्हती. बॉम्बचा शोध घेतल्यानंतर ३.५० वाजता राज्य शीघ्र कृती दलाचे जवान पोहोचले.नियमित मॉक ड्रीलब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी(बीसीएएस)च्या दिशानिर्देशानुसार दरवर्षी ही प्रक्रि या केली जाते. यात सर्व एअरलाईन्सची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलीस व अन्य संबंधित विभाग सहभागी झाले होते. या मोहिमेतील काही ठराविक लोकांना वगळता याची कुणालाही माहिती नव्हती की ही एक मॉक ड्रील आहे.विजय मुळेकर, सिनियर एअरपोर्ट डायरेक्टर, एमआयएल बैठकीत झाली चर्चामॉक ड्रीलनंतर जुन्या टर्मिनल बिल्डिंगच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात एमआयएलचे सिनियर एअरपोर्ट डायरेक्टर विजय मुळेकर, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट टी.डी. विन्सेंट, एमआयएलचे अधिकारी लक्ष्मीनारायण, सोनेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह अन्य विभाग व एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कारवाईच्या वेळेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी निकषानुसार ड्रीलमध्ये सहभागी विभागांनासुद्धा माहिती पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरBombsस्फोटके