शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युद्धातील दोन रणगाडे कस्तूरचंद पार्कवर ठेवणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:05 IST

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसेनेद्वारे आलेल्या प्रस्तावाला हेरिटेज समितीची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तान आणि भारत-चीनमधील युद्धात भारतीय सेनेने वापरलेले दोन विजयंता नामक रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया या सेनेच्या मुख्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावाला बुधवारी हेरिटेज समितीने मंजुरी दिली.महापालिका मुख्यालायत डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली हेरिटेज समितीची बैठक पार पडली. यात रणगाड्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला आला होता. समितीने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. यावेळी समितीचे सदस्य आणि मनपाचे उपायुक्त राजेश मोहिते, समिती सदस्य सचिव व नगररचना विभागाचे सहायक संचालक (प्रभारी) सुनील दहिकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुप्रिया थूल, डॉ. शुभा जोहरी, उज्ज्वला चक्रदेव, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया सेना मुख्यालयाचे कर्नल राकेश कुमार आदी उपस्थित होते.भारतीय सेनेच्या उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरियाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. सेनेमार्फत भारतीय युद्धात वापरण्यात आलेले विजयंता नावाचे दोन रणगाडे कस्तूरचंद पार्क येथे विद्यार्थी व पर्यटकांसाठी ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला हेरिटेज समितीने मंजुरी दिली. या रणगाड्याची देखभाल व दुरुस्ती सेनेद्वारे करण्यात येणार आहे. हे रणगाडे दिल्लीवरून नागपुरात दाखल झाले आहेत.काही दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्क येथे उत्खननात चार तोफा सापडल्या होत्या. त्या तोफांना पर्यटनासाठी कस्तूरचंद पार्क येथे ठेवण्यात यावे, यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव अशोक मोखा यांनी मांडला. याला समितीने मंजुरी दिली..नागपूर मेट्रो रेल्वेमार्फत झिरो माईल येथे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव समितीला सादर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैठकीमध्ये मेट्रोद्वारे सादरीकरण करण्यात आले. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव पुढील बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश समितीने दिले.

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्कnagpurनागपूर