शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परफ्युम घ्यायला गेले अन सूपर बाजार लुटण्यासाठी धमकावले, कॉंग्रेसनगरात थरार

By योगेश पांडे | Updated: August 22, 2023 18:17 IST

दुकानातील कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला धरले

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉंग्रेसनगर परिसरातील एका सूपरबाजारमध्ये आलेल्या दोन आरोपींनी ग्राहकांना लुटण्याचा प्रयत्न केला तसेच शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. दुकानातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्यामुळे एकाला ते पकडू शकले तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

ओम उर्फ चिन्ना शोभा राठोड (२२, अजनी रेल्वे क्वॉर्टर) व अमन सुरेंद्र बिंचुलकर (१९, जोशीवाडी, अजनी) अशी आरोपींची नावे आहेत. कॉंग्रेसनगरमध्ये बेस्ट सूपर बाजार आहे. दोन दिवसांअगोदर रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दोघेही तेथे गेले. एकाने सूपर बाजारातून परफ्युमची बॉटल घेतली मात्र त्याने पैसेच दिले नाही. ड्युटीवरील सुरक्षारक्षक अवधेश गौतम (५३) यांनी त्याला विचारणा केली असता ओमने त्यांना धमकावले. बॉटल गाडीच्या डिक्कीत ठेवून तो परत काऊंटरवर आला व त्याने शिवीगाळ करत चाकू काढला. तेथे उभ्या असलेल्या ग्राहकाच्या हातातील सहाशे रुपये त्याने हिसकावले. बाहेर उभ्या असलेल्या अमननेदेखील चाकू दाखविला.

गौतम यांनी ओमला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली व जखमी केले. हा प्रकार पाहून दुकानातील सर्व कर्मचारी एकत्रित आले. दोन्ही आरोपी पळून जात असताना त्यांनी ओमला पकडले. धंतोली पोलीस ठाण्याला हा प्रकार कळविण्यात आला. कर्मचाऱ्यांनी ओमला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने अमनचा पत्ता सांगितला. अमनलादेखील पोलिसांनी अटक केली. गौतम यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता बाहेर आणखी सहकारीदेखील उभे असल्याची माहिती त्यांनी दिली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर