शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन पिस्तुलांसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:37 IST

गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांनी दोन गुंडांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसं जप्त केली.

ठळक मुद्देतीन काडतूसही जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांनी दोन गुंडांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसं जप्त केली.मोहम्मद फैजान मोहम्मद अकरम अन्सारी (वय २२, रा. आशीनगर) आणि सरफराज खान समद खान (वय २२, रा. ताजनगर, टेका) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानुसार, शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास पोलिसांनी पाचपावलीतील ताजनगरमध्ये छापा घालून एका ठिकाणी फैजान आणि सरफराजला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस आढळली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन मोबाईल तसेच अ‍ॅक्टीव्हा जप्त केली.फैजान आणि सरफराज हे दोघेही कुख्यात फैजूलच्या टोळीचे गुंड आहेत. ते जनावरांची अवैध वाहतूक करण्याच्या गोरखधंद्यात सहभागी असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हेही दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या पाळतीवर होते. या दोघांकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त संजीव कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत, सहायक निरीक्षक योगेश चौधरी, हवलदार रफिक खान, शैलेश पाटील, नायक अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, हरीश बावणे, राजू पोतदार आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.शहरात घोड्यांचा बोलबालालकडगंज पोलिसांनी शुक्रवारी ३० जिवंत काडतूस आणि रायफलसह तिघांना अटक केल्याची घडामोड चर्चेत असतानाच गुन्हे शाखेने पुन्हा दोन पिस्तूल पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी वर्तुळात अग्निशस्त्राला (पिस्तूल, रायफल) घोडा म्हणतात. सध्या नागपुरात घोड्यांचा बोलबाला आहे. अधूनमधून पकडले जात असल्याने तेवढी चर्चा होते. गुन्हेगारी वर्तुळात घोड्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक