शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी’ इंजिनिअरला ‘ट्विटर’मुळे मिळाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 20:15 IST

रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली.

ठळक मुद्देरेल्वेची तत्परता : रेल्वेगाडी थांबवून पोहोचविली औषधे

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मागील काही काळापासून ‘ट्विटर’च्या माध्यमातून भारतीय रेल्वे प्रशासन जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील एका ‘आयटी’ इंजिनिअर दाम्पत्यालादेखील याचा अनुभव आला. रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली.पिंपरी चिंचवड येथील रहिवासी सूरज रायबागकर व त्यांची पत्नी सोनाली रायबागकर हे अजनी स्थानकाहून पुण्याकडे जाण्यासाठी २२१४०-हमसफर एक्स्प्रेसने निघाले. मध्यरात्रीनंतर सोनाली यांची प्रकृती अचानक खराब झाली व त्यांना प्रचंड तापदेखील चढला. अशा स्थितीत सूरज यांनी रेल्वेत औषधे आहेत का किंवा काही वैद्यकीय मदत मिळेल का याची चौकशी केली. बहुतांश लोक गाढ झोपेत असल्याने मदत मिळाली नाही. अखेर मनमाड स्टेशन गेल्यानंतर सूरज यांनी रेल्वेच्या ‘ट्विटर’वर आपली समस्या मांडली व कमीत कमी औषधे उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सूरज यांना फारशी अपेक्षा नव्हती. परंतु मध्य रेल्वेकडून तत्काळ त्यांच्या ‘ट्विटर’वर उत्तर देण्यात आले व त्यांचा मोबाईल क्रमांक तसेच बर्थ-कोच क्रमांक मागण्यात आला. मनमाडनंतर हमसफर एक्स्प्रेसचा थांबा थेट दौंड स्थानकावर असतो. मात्र मध्य रेल्वेने वैद्यकीय मदत पोहोचविण्याकरिता थांबा नसलेल्या कोपरगाव स्थानकावर गाडी थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी औषधे पोहोचविली तसेच वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेण्याचीदेखील तयारी दाखविली. वेळेवर औषधे पोहोचल्याने रायबागकर दाम्पत्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. विशेष म्हणजे आवश्यक मदत पोहोचली की नाही याची ‘कंट्रोल रुम’कडून विचारणा करण्यात आली व त्यानंतरच रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली. रेल्वेकडून ‘ट्विटर’च्या माध्यमातून प्रवाशांना मदत करण्यात येते असे केवळ ऐकलेच होते. प्रत्यक्षात इतकी तत्परता दाखविण्यात येत असेल असा अंदाजदेखील नव्हता. रेल्वेतर्फे प्रवाशांच्या हितासाठी खरोखरच चांगला पुढाकार घेण्यात येत आहे, या शब्दांत सूरज रायबागकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

टॅग्स :railwayरेल्वेTwitterट्विटर