गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता शाळांचे होणार ट्युनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 09:53 AM2019-08-18T09:53:33+5:302019-08-18T09:55:59+5:30

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत.

Tuning of schools will now be done for quality education | गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता शाळांचे होणार ट्युनिंग

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता शाळांचे होणार ट्युनिंग

Next
ठळक मुद्देप्रत्येक केंद्रातून दोन शाळा जोडणार शिक्षणासोबत भौतिक सुविधांचेही सहकार्य

ऑनलाईन लोकमत्
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भारत सरकार व राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अनेकवेळा निरनिराळे प्रयोग करून उपक्रम राबविले. याअंतर्गत आता दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत. त्यातील एक शाळा शाळासिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीत येणे आवश्यक आहे.
सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांनी सर्वांगीण गुणवत्ता विकास (सगुण) (ट्युनिंग ऑफ स्कूल) कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांना माहिती गोळा करण्याचे काम दिले आहे. यासंदर्भातील आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्यातील ४,८६० ग्रामीण भागातील समूह साधन केंद्र व शहरी भागातील शहर साधन केंद्रातील केंद्रप्रमुखांना केंद्रातील शाळांमधून शाळा सिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीप्राप्त एका शाळेची निवड करून, दुसरी एक शाळा जोडावयाची आहे. या निवडलेल्या दोन शाळांमध्ये सहकार्य घेणे व सहकार्य देणे अशा सामंजस्य आंतरक्रिया घडवून आणणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सात मुद्यांवर सहकार्य घेण्यास व सहकार्य करण्यास तयार आहे किंवा कसे? याबाबत स्पष्टपणे माहिती केंद्रप्रमुखांना नोंदवायची आहे.

केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरणे आवश्यक
विद्या प्राधिकरणाचा ‘सगुण’ उपक्रम चांगला आहे. मात्र राज्यातील केंद्रप्रमुखांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. या उपक्रमाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवरच दिली आहे. शाळांच्या संख्यात्मक वाढीमुळे शाळांवर संनियंत्रण करण्यासाठी २४ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आलेल्या समूह साधन केंद्राची फेररचना करण्यात यावी तरच गुणवत्ता विकासास चालना मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केली आहे.

Web Title: Tuning of schools will now be done for quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.