शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

तुकाराम मुंढे यांचा दणका : वोक्हार्ट व सेव्हन स्टारने परत केले रुग्णांचे १०.५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 22:47 IST

शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वोक्हार्ट हॉस्पिटलने ९.५० लाख तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत.

ठळक मुद्देआकारलेले जादा शुल्क परत करण्याची पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वोक्हार्ट हॉस्पिटलने ९.५० लाख तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाने कोविड रुग्णांकडून आकारलेले जास्तीचे पैसे परत करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

 कोविड रुग्णांकडून वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटल अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. वोक्हार्ट व्यवस्थापनाकडून कुठलेही उत्तर सादर करण्यात न आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट रुग्णालयाला दणका देत रुग्णांकडून लाटलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा दिल्यानंतर वोक्हार्ट व्यवस्थापनाकडून रुग्णांकडून अतिरिक्त शुल्काच्या नावावर घेण्यात आलेले ९.५० लाख रुपये परत करण्यात आले. तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये परत केले.महाराष्ट्र सरकारकडून कोविड रुग्णांसाठी आकारण्यात येणाºया शुल्काबाबत नियमावली जारी केली आहे. ही नियमावली खासगी रुग्णालयात पाळण्यात येत आहे की नाही, हे तपासणीसाठी महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. पथकाकडून काही दिवसांपूर्वी वोक्हार्ट पाठोपाठ सेव्हन स्टार हॉस्पिटलची आकस्मिक पाहणी केली होती. येथील रेकॉर्ड तपासण्यात आले. यातून सेव्हन स्टार हॉस्पिटलकडून शासन व महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे पुढे आले होते. मुंढे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. २४ तासात आपल्याविरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाई का करू नये, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. दोन्ही रुग्णालयांकडून २४ तासात उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर मनपा आयुक्तांकडून हॉस्पिटलवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. सेव्हन स्टारवर कारवाई होणारसेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आले आहे. या रुग्णांची संख्या जवळपास एक हजार आहे. त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याची शक्यता मनपा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.नियमांची केली पायमल्लीवोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाकडून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरफलक लावण्यात आलेला नव्हता. ८० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आलेले नव्हते. रुग्णांकडून अधिकचे शुल्क जमा करून घेतले जाते. परंतु डिस्चार्ज देताना ही रक्कम रुग्णांना परत केली जात नाही. याशिवाय अनेक बाबतीत रुग्णालयात अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यानंतर, आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दोन दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या