शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:07 IST

नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआयुक्तांच्या निर्णयावर महापौरांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.दुकानदार व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी करायाची आहे. त्यानंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास महापालिकेतर्फे कारवाई करीत दुकान बंद करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागपूर शहरात ५० हजार व्यापारी आहेत. त्यांच्याकडील कर्मचारी गृहित धरता ही संख्या पाच लाखांवर जाते. शहरात दररोज तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत १८ तारखेपर्यंत पाच लाख लोकांची चाचणी कशी करणार? यासाठी एका दिवशी ८० हजार तपासण्या कराव्या लागतील आणि यावर जवळपास ८० कोटी रुपये खर्च येईल. आजच्या परिस्थितीत हे शक्य नसल्याने आयुक्तांनी घेतलेला निर्णय तुघलकी व अव्यवहार्य असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.एनजीओची मदत घेणारकोरोना रुग्णांची वाढती संख्या व संसर्ग विचारात घेता मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील भार वाढला आहे. यंत्रणा कोलमडण्याकडे वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील एनजीओची मदत घेण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.व्यापाऱ्यांमध्ये संभ्रममनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदार आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. व्यवसाय करून १८ ऑगस्टपर्यंत चाचणी कशी करायची, अशी चर्चा गुरुवारी व्यापाऱ्यांमध्ये होती.मनपाने झोननिहाय २२ चाचणी केंद्र सुरू केले आहेत. त्या ठिकाणी मोफत चाचणी होणार आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये अ‍ॅन्टिजन चाचणीसाठी ७०० रुपये खर्च येणार आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुकानात येणारे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आहेत वा नाही, याची माहिती दुकानदारांना नसते. पण स्वत:ला आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त राहतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना निर्भीडपणे व्यवसाय करणे शक्य होणार आहे. ही दूरदूष्टी ठेवूनच मनपा आयुक्तांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. पुढे आदेश काढल्यानंतर अडचणी उद्भवू नये म्हणून दुकानदारांनी आताच स्वत:हून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केल्याचे अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. १८ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांनी चाचणी केलेली नाही, असे आढळून आल्यास पुढे आयुक्त चाचणीचा कठोर आदेश काढू शकतात. तेव्हा व्यापाऱ्यांसाठी ही बाब अडचणीची ठरणार असल्याचे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, चेंबरच्या अध्यक्षांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना चाचणी करायची की व्यवसाय, हा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानदारांना आदेश देऊन काहीही होणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी काम करावे. आपले आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याची सूचना करावी, आदेश काढू नये. यासंदर्भात असोसिएशन आणि कॅट नागपूरचे पदाधिकारी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या