शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग आणण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 21:29 IST

विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन आणि वेदतर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) सुरू झाला आहे.

ठळक मुद्देमार्केटिंगसाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती : मुंबईत होणार रोड शो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन आणि वेदतर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) सुरू झाला आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठबळामुळे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेदचे पदाधिकारी, मिहानचे उच्च अधिकारी व महाराष्ट्र शासन यांची संयुक्त बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी, वल्सा नायर सिंह, वेदचे विलास काळे, गोविंद डागा, देवेंद्र पारेख, नवीन मालेवार, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.मिहानच्या मार्केटिंगसाठी सकारात्मक भूमिकामिहानमध्ये सेक्टरनुसार प्रत्येक उद्योगाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. या सल्लागारांच्या माध्यमातून अवजड उद्योग व मोठे उद्योग येथे कसे येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. फार्मा उद्योग, संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचे उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचे उद्योग, मोठे विदेशी उद्योग मिहानमध्ये यावेत यासाठी मार्केटिंग केले जाणार आहे. एमएडीसी, वेद, आणि शासन यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. मंगळवारच्या बैठकीत यासंदर्भात अत्यंत सकारात्मक भूमिका उपस्थित सर्वांनी घेतली.शिष्टमंडळातर्फे १९ एप्रिलला पाहणीमिहानचा परिसर मोठ्या उद्योगांसाठी अत्यंत पोषक आणि उपयोगी असून येत्या १९ एप्रिल रोजी २० तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ या परिसराची पाहणी करणार आहेत. या शिष्टमंडळात उद्योग क्षेत्रातील विदेशी तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. विदेशी उद्योगांना मिहानच्या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यात अधिक रस असल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली. दर्जेदार व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वस्तू व साहित्याची निर्मिती करणारे उद्योग येथे यावेत हाच प्रयत्न यातून राहणार आहे.मुंबईत रोड शोआंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या उद्योगांना मिहानमध्ये आकर्षित करण्यासाठी आगामी महिन्याभरात मुंबईत एका रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. लवकरच या आंतरराष्ट्रीय सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर