शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात पोलिसाच्या अंगावर कार चालविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:15 IST

भंडारा मार्गावर प्रजापती चौकात निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कारने धडक देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला.

ठळक मुद्देभंडारा मार्गावरील घटना : कारवाई न झाल्यामुळे पोलिसांमध्ये असंतोष

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : भंडारा मार्गावर प्रजापती चौकात निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कारने धडक देण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारवाई करण्याऐवजी प्रकरण शांत करण्याची भूमिका घेण्यात आल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.निवडणुकीच्या काळात शहरातील प्रमुख मार्गावर तपास पथक तैनात करण्यात आले आहेत. भंडारा मार्गावर प्रजापतीनगर चौकात अस्थायी पोलीस चौकी तयार करून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. नंदनवन ठाण्यातील हवालदार सुनील शिंदे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, कार क्रमांक सी. बी. १६, सी. एल.-७००७ तेथून जात होती. निवडणूक अधिकारी आणि सुनील शिंदे यांनी कारला थांबविण्याचा इशारा केला. चालकाने कार वेगाने शिंदे यांच्याकडे नेली. कारला आपल्याकडे वेगाने येताना पाहून शिंदे यांनी पाय मागे घेतले. हे दृश्य पाहून शिंदे यांचे सहकारी कारजवळ आले. कारमध्ये एच. बी. टाऊन येथील रहिवासी पारस सुभाषचंद्र जैन होता. कारचे काच खाली करून त्याने शिंदेसोबत वाद घातला. शिंदेवर शिवीगाळ केल्याचा आरोप लावला. शिंदेच्या बाजूने अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उभे होते. खोटे आरोप लावल्यामुळे ते सुद्धा हैराण झाले. तेथे उपस्थित व्हिडीओग्राफरने या प्रसंगाची शुटींग केली. पारसने आपल्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांने शिंदे यांना पारसला सहकार्य करण्यास सांगितले. परंतु त्यानंतरही त्याची वागणूक न बदलल्याने शिंदे यांनी वरिष्ठांना सूचना दिली. शिंदे आणि त्यांचे सहकारी पारससोबत वाठोडा ठाण्यात पोहोचले. शिंदे यांनी घटनेची तक्रार दाखल केली. पारसचे सहकारीही ठाण्यात पोहोचले. ते शिंदेची माफी मागत होते. दीड तास वाठोडा ठाण्यात गोंधळ सुरू होता. याप्रकरणी काहीच कारवाई न झाल्यामुळे पोलिसात असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस