बुटीबाेरी : लाॅकडाऊनमुळे गावातील रस्त्यात उभा केला ट्रक आराेपींनी चाेरून नेला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभरी येथे १३ ते १४ मार्चदरम्यान घडली.
श्रीकांत राजेंद्रप्रसाद सिंग (३६, रा. टेंभरी) यांनी आपला एमएच-४०/बीएल-२७५८ क्रमांकाचा ट्रक लाॅकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर उभा केला हाेता. दरम्यान, आराेपी भीम चवरे व विकास दाेन्ही रा.टेंभरी यांनी ‘ट्रक राेडवर उभा आहे, त्याला बाजूला करायचे आहे,’ असे म्हणून सिंग यांच्या पत्नीकडून ट्रकची चावी घेऊन गेले. दरम्यान, श्रीकांत सिंग बाहेरगावाहून परत आल्यानंतर त्यांना ट्रक दिसून न आल्याने शाेधाशाेध केली व फायन्सरकडे विचारपूस केली, परंतु ट्रक कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. सदर ट्रकची किंमत पाच लाख रुपये आहे. या प्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक फाैजदार तरमळे करीत आहेत.