शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत अ‍ॅपेचालकाचा मृत्यू : पत्नी, दोन वर्षीय चिमुकल्यासह चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:28 IST

भरधाव ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे वनदेवीनगरातील एक हसता खेळता परिवार क्षणात उध्वस्त झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला.

ठळक मुद्देपरिवार झाला निराधार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भरधाव ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे वनदेवीनगरातील एक हसता खेळता परिवार क्षणात उध्वस्त झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी हा अपघात घडला.मेहबूब अली मुकदर अली (वय ४२) यशोधरानगरातील वनदेवीनगरात राहत होते. ते आॅटो चालवायचे. पै-पैका जोडून त्यांनी नुकताच नवीन अ‍ॅपे (एमएच ४०/ एसी ११०९) विकत घेतला. त्याचा आनंद परिवार साजरा करीत होता. नवीन अ‍ॅपेत बसून सर्वांनी कामठीला दर्शनाला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजता मेहबूब अली, त्यांची पत्नी शकिला बानो (वय ३५), दोन वर्षीय मुलगा मासूम अली, मेव्हणी शकिला मोहम्मद ताहिर (वय ३०, रा. संगमनगर) आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रज्जाक अंसारी हे सर्व अ‍ॅपेत बसून कामठीकडे निघाले. कळमना रिंग रोडवरओबेरॉय पॅलेस जवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रक (एमएच ३१/ सीक्युू ५५३०)च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून मेहबूब अलीच्या अ‍ॅपेला जोरदार धडक मारली. त्यामुळे अ‍ॅपेत बसलेल्या मेहबूब अली आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जबर जखमा झाल्या. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मेहबूब यांना मृत घोषित केले. दोन वर्षीय चिमुकला मासूम गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने धाव घेतल्याचे पाहून आरोपी चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला. शकिला यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्यातील हवलदार अक्षय सोरदे यांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.परिवार झाला निराधारनवीन वाहन घेतल्याच्या आनंदाने मेहबूब अलीच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यामुळे हसत गप्पा करीत ते कामठीकडे निघाले होते. मात्र, काही कळायच्या आतच काळाने मेहबूब यांच्यावर झडप घातली. आता कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे मेहबूबअलीचा परिवार झटक्यात उध्वस्त झाला आहे.

 

 

टॅग्स :Accidentअपघात