शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तडीपार गुंडाकडून ट्रकचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:50 IST

प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देप्रेयसीवर नजर टाकल्याचा राग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली.विजय बहादूर यादव (वय २५) असे मृताचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील रहिवासी होता.रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात काही वर्षांपूर्वी आलेला विजय येथील कामगार नगरात राहत होता.नारा रिंग रोडवरील एका मार्बलच्या दुकानात तो वाहनचालक म्हणून काम करत होता. तर, त्याची हत्या करणारा आरोपी डॅनी ऊर्फ सागर यादव शांतिनगरातील रहिवासी आहे. डॅनी कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला चार महिन्यांपूर्वी नागपुरातून तडीपार करण्यात आले होते.विजयची मैत्रीण गंगाजमुनात राहते. याच रिंगरोडवर एका ठिकाणी आरोपी डॅनीचीही प्रेयसी राहते. तिला भेटण्यासाठी डॅनी गुरुवारी पहाटे २ नंतर तिच्या घराजवळ आला. ठरल्याप्रमाणे त्याची प्रेयसी घराजवळच रस्त्याच्या कडेला आली. ती आणि डॅनी गप्पा करीत असताना पहाटे २.३० च्या सुमारास तेथून विजय जाऊ लागला. डॅनीसोबत तरुणी बोलत असल्याचे पाहून विजयचा गैरसमज झाला. ती गंगाजमुनातील देहविक्रय करणारी तरुणी असावी, असा गैरसमज झाल्याने तो तिच्याकडे एकटक पाहत उभा राहिला. ते पाहून आरोपी डॅनीने त्याला हटकले. काय आहे, असे विचारले. विजयनेही त्याला तुझे काय आहे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. डॅनीने शिवीगाळ केल्यामुळे विजयनेही त्याला शिवीगाळ केली. प्रेयसीसमोर अपमान झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॅनीने जवळचा चाकू काढून विजयच्या कंबरेखाली घाव घातले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी डॅनी आणि त्याची प्रेयसी पळून गेले.सीसीटीव्हीतून उलगडासकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लकडगंजचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. मृताची किंवा मारेकऱ्याची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात हत्येचे सर्व शुटिंग पोलिसांच्या हाती लागले. आरोपीच्या छायाचित्रावरून त्याची ओळखही पटली. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढून त्याला अटक केली. या घटनेमुळे तडीपार गुंड शहरातच वास्तव्याला असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर