शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला धडक देऊन नदीत ट्रक कोसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:14 IST

उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला.

ठळक मुद्देउमरेडमधील आमनदीवरील अपघातट्रकचालकाने काढला पळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला.घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी उमरेड नागपूर महामार्गावर आपला संताप व्यक्त केला.जयसिंग यादव (४६, रा. वायगाव घोटुर्ली) असे जखमीचे नाव आहे. जयसिंग यादव यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. वेकोलि येथून उमरेडकडे एमएच-३४/डीजी-१५१४ क्रमांकाचा ट्रक जात होता. अशातच समोरून येणाऱ्या एमएच-४०/एव्ही-६५१५ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यानंतर ट्रक आमनदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये ट्रकचालक थोडक्यात बचावला. तेथून ट्रकचालक कसाबसा बाहेर निघून पसार झाला. याबाबत उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे आधी करातुटलेले संरक्षक कठडे आणि जीर्ण झालेल्या पुलाला शंभर वर्षापेक्षाही अधिक काळ लोटलेला आहे. शिवाय तुटलेले कठडे धोकादायक वाटतात. या पुलावरून प्रवास करताना दुचाकी - चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. नागपूर-उमरेड चारपदरी होईल तेव्हा होईल; पण आधी या पुलाच्या कठड्यांचे तसेच डागडुजीचे काम करा आणि अशा अपघातांना आळा घालावा, अशी मागणी उमरेड येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात